विवाहितेची चिमुरडीसह आत्महत्या.

Published on -

राहाता :- तालुक्यातील नांदुर्खी येथे एका गर्भवती महिलेने तिच्या सहा महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी पतीसह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने राहाता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. नांदुर्खी येथील निकिता सुरज चौधरी (वय २४) ही विवाहिता साडेतीन महिन्यांची गर्भवती होती.

तिने बुधवारी (दि. ६) फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात कोणी नसताना आपल्या सहा महिन्याच्या अन्वि या चिमुकलीला गळा दाबून ठार मारले. त्यानंतर तिने स्वत: घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!