अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासह सामाजिक कार्यात योगदान देणार्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील गौतम बुध्द जॉगिंगपार्क मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात ज्येष्ठ नागरिकांसह युवक व महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. उद्यानात झालेल्या स्वच्छतेने एक प्रसन्नदायी वातावरण निर्माण झाले होते.
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला जात आहे. ग्रुपच्या सदस्यांनी रक्तदान, नेत्रदान, देहदान संकल्प, वृक्षरोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आदी विविध उपक्रमांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत. ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर रमेशराव त्रिमुखे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी सुभाषराव गोंधळे, रमेश वराडे, नामदेव जावळे, दिनेश शहापूरकर, अशोक लोंढे, रमेश त्रिमुखे, सुनिल नागपूरे, बॉबीसिंग वाजवा, छावणी परिषदेचे स्वच्छता निरीक्षक रमेश साके, सुधाकर चिदंबर, मनोहर पाडळे, विश्वास वाघस्कर, सुरेश कानडे, राजू कांबळे, सचिन चोपडा, रामनाथ गर्जे, सत्यजीत कस्तुरे, दिलीप ठोकळ, सुंदरराव पाटील, रुमाजी बोराडे, जालिंदर बोरुडे, दिलीप गुगळे, जालिंदर बेल्हेकर, विकास भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, सर्व धर्म, संस्कृतीमध्ये स्वच्छतेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. समाजात अस्वच्छता पसरल्याने साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. निरोगी जीवनासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. नागरिकांना जागृक राहून स्वच्छतेची जबाबदारी कर्तव्य म्हणून पार पाडल्यास बदल घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रमेशराव त्रिमुखे यांनी ग्रुपच्या सदस्यांनी घेतलेल्या उपक्रमांनी आपण भारावलो असून, सामाजिक कार्यात प्रत्येकाने वाटा उचलल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. तर सामाजिक कार्य हे मनाला सुख व समाधान देणारे आहे. त्याची किंमत पैश्यात करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानात संतोष हजारे, विठ्ठल राहिंज, जालिंदर अळकुटे, विनोद खोत, भिमराव फुंदे, अब्बास शेख, पंकज धर्माधिकारी, सुभाष त्रिमुखे, अजेश पुरी, सुयोग चेंगडे, प्रविण परदेशी, आनंद सदलापूर, महेश सरोदे, विकास निमसे, सुर्यकांत कटोरे, अरुण क्षीरसागर, महेश नामदे, राजू काळे, सिताराम परदेशी, विलास दळवी, दिपक बडदे, रमाकांत जाधव, कांता वाघुले, दिलीप पोरवाल, रमेश कडूस, भिमराज ठाकूर, लुईस नरोना,
प्रभाकर ठोंबरे, किसन भोसले, लक्ष्मण नागपूरे, देवीदास गंडाळ, निलेश गुगळे, मिनाक्षी खोगरे, ठोकळताई, बोराडेताई, यशवंत कडूस, सचिन गुगळे, हनुमंत परदेशी, वैभव गुगळे, नितीन भिंगारकर सहभागी झाले होते. या अभियानाच्या माध्यमातून गौतम बुध्द जॉगिंगपार्क मधील व परिसरातील कचरा जमा करुन त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.
- Apollo Tyres Share Price: अपोलो टायर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? सध्याची ट्रेडिंग पोझिशन काय? रेटिंग अपडेट
- ONGC Share Price: तज्ञ म्हणतात ONGC चा शेअर खरेदी करा! मात्र 1 वर्षात झाली 20.28% घसरण…बघा आजची किंमत
- CDSL Share Price: मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आज मोठ्या कमाईची संधी! नोट करा तज्ञांची टार्गेट प्राईस
- Vedanta Share Price: वेदांता शेअर आज बुलीश…मोठ्या प्रमाणावर खरेदी! तज्ञ म्हणतात की…
- IFCI Share Price: IFCI शेअर्समध्ये मागच्या आठवड्यापासून तेजी! दिला 5.82% रिटर्न… आज मात्र?