१२० कोटी जनता अन आडनावं फक्त १००; अजब चीन ची गजब गोष्ट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- २०१० च्या जनगणने च्या तुलनेत चीन मध्ये ८६ % लोकांमध्ये फक्त १०० आडनावं आहेत. चीन मध्ये अशी काही आडनावं आहेत ज्यांना तब्बल ३० % लोकांनी म्हणजेच ४३.५ % लोकांनी स्वीकारलं आहे.

या मध्ये प्रामुख्याने वांग,ली,झाँग,लिऊ आणि चेन या आडनावांचा समावेश आहे. खर पहिले तर चीन मध्ये आडनावांचा दुष्काळ पडलेला आहे असे म्हणायला हरकत नाही.

चीनच्या लोकसुरक्षा मंत्रालयाच्या कागदपत्रांच्या विश्लेषणानंतर याबाबत अधिक माहिती मिळाली आहे. या कागद पत्रांमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहिती नुसार,२०१० च्या जनगणनेच्या तुलनेत फक्त १०० च आडनावं आढळून आली आहेत.

स्थानिक माध्यमांच्या रिपोर्ट नुसार चीन मध्ये पहिल्यांदा २३ हजार आडनावं प्रचलित होती. त्यानंतर त्यांची संख्या ६००० इतकीच राहिली आहे.

साहाय्यक प्राध्यापक चेन जिआवे यांनी नमूद केले आहे कि चीन मध्ये वंश आणि समुदायात विविधता आता पहिल्या सारखी राहिली नाही.

भाषिक कारणास्तव,चिनी भाषेमध्ये कोणतेही अतिरिक्त आडनाव जोडणे किंवा वजा करणे हे इतके सोपे नाही. डिजिटल जगात मागे राहू नये म्हणून बऱ्याच लोकांनी जुने आडनाव सोडले आहे आणि नवीन आडनाव स्वीकारले आहे.

त्यांनी म्हटले आहे कि या नाव बदला मुळे इथल्या लोकांना दुःख आहे कि त्यांच्या पिढ्या,त्यांचा इतिहास ,ओळख,परंपरा लोक विसरून जातील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment