अहमदनगर लाईव्ह24 टीम :- भारतातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. महिला सबलीकरणासाठी विविध कार्यक्रम राबवण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यास अपयश येत असल्याचे दिसत आहे .
रेल्वे परिसरात बलात्काराची संख्या पाहिली तर शरमेने मान खाली गेल्यावाचून राहणार नाही.रेल्वे तसेच स्थानक परिसर महिलांच्या दृष्टीने सुरक्षित नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत १६५ अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहे. याच काळात ४ हजार ७१८ लुटीच्या तर ५४२ हत्येच्या घटनाही उजेडात आल्या.
माहिती अधिकार कार्यकर्ता चंद्रशेखर गौड यांनी दाखल केलेल्या अर्जावर रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली. २०१७-१९ या दरम्यान १३६ अत्याचाराच्या घटना घडल्या तर २९ प्रकरणांत चालत्या रेल्वेत महिलांवर अत्याचार करण्यात आला.
२०१७ च्या तुलनेत २०१९ मध्ये अशा प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. २०१८ मध्ये ७० महिलांवर अत्याचार झाला. दुसरीकडे रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी काही कडक पावले उचलली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचा भाग म्हणून २२०० रेल्वे गाड्यात जीआरपी सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षेसाठी १८२ क्रमांक सुरू करण्यात आला आहे. लेडिज स्पेशल रेल्वेत महिला आरपीएफला तैनात करण्यात आले आहे.
तथापि, महिलाच्या सुरक्षेसाठी रेल्वेने काही पावलं उचलली आहेत. गेल्या महिन्यात राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना महिल्यांच्या सुरक्षेबाबत माहिती दिली. चिन्हांकित मार्ग आणि सेक्शन्समध्ये २२०० ट्रेनमध्ये आरपीएफ सुरक्षा देण्यात येत असून २२०० ट्रेनमध्ये जीआरपी सुरक्षा पुरवण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी राज्यसभेत म्हटले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com