अहमदनगर जिह्यातील धक्कादायक घटना: 27 वर्षीय सुनेवर सासऱ्याने केला अत्याचार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. यामुळे महिलांची सुरक्षितता व अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच संगमनेर मध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

२७ वर्षीय सुनेवर सासऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पती व सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सदर घटना संगमनेर तालुक्यातील राजापुरात घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे कि, मी खोलीत एकटी असताना सासरा खोलीत आला.

‘मला तू फार आवडतेस’ असे म्हणून तोंड दाबून अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. सासऱ्याने दोनदा केलेल्या अत्याचाराबाबत पतीला सांगितले.

‘ तुला माझे वडील म्हणतील तसे ऐकावेच लागेल’ असे पतीने सांगितले. तुमच्या विरोधात तक्रार देणार आहे, असे म्हटल्यानंतर पोटावर काठीने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले अधिक तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News