अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अहमदनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था ही सभासदांचे हित जोपासणारी संस्था आहे. सभासदांचे हित लक्षात घेऊन संचालक मंडळाने सभासदांसाठी विविध निर्णय घेण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. देशात संध्या कोरोनाचा संसर्गविषाणूचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
नगर शहरातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहे. मनपाचे कर्मचारी प्रत्यक्षात कोरोना संसर्गविषाणूचा प्रार्दभाव होऊ नये यासाठी शहरात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे.
यासाठी कोरोना संसर्ग आजाराने जर दुर्देवी मृत्यु झाल्यास अहमदनगर महानगर पालिका कर्मचारी पंतसंस्थेच्या वतीने ५0 हजार रू. तातडीची मदत देण्यात येणार आहे.
तसेच संस्थेतील सहा सभासद दुर्देवी मयत झाल्यामुळे त्यांनी घेतलेले कर्ज निवारण निधीमधून सुमारे ४ लाख ५३ हजार २३८ रुपये माफ करण्यात आले.
तसेच सभासदांना २0१९-२0 सालासाठीचा १५ टक्के डिव्हिडंट (लाभांश) वाटपाची तरतूद करण्यात आलेली आहे. याविषयीची सूचना संचालक सतीश ताठे यांनी मांडली.
त्याला अनुमोदन जितेंद्र सारसर यांनी दिले. कोरोनाच्या काळात वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी तालुका उपनिबंधक कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने झुम अँपद्रवारे सभा घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
सभेला मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच सभासदांना १५ टक्के डिव्हिडंट वाटप करण्यात येणार आहे. वैद्यकीय मदत म्हणून सभासद मंगल काळे यांना २५ हजार रुपयांची तातडीची मदत पतसंस्थेने दिली असल्याची माहिती चेअरमन बाबासाहेब मुदगल यांनी दिली.
यावेळी व्हा. चेअरमन विकास गिते, जितेंद्र सारसर, किशोर कानडे, सतीश ताठे, बाळासाहेब पवार, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब गंगेकर , प्रकाश आजबे, कैलास भोसले, अजय कांबळे, संचालिका नंदा भिंगारदिवे, चंद्रकाल खलचे, व्यवस्थापक आनंद तिवारी, उपव्यवस्थापक राजू गंधे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews