अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मोहटा देवस्थान समितीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे दिला.
दहा दिवसांपासून शहरात रामनाथबंग मित्रमंडळाच्या वतीने गोरगरिबांना जीवनाश्यक वस्तू उपक्रम राबवून अनेक भुकेलेल्यांची भूक भागवली. शंकर महाराज मठाचे संस्थापक माधवबाबा, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब राऊत, उद्योजक संदीप काटे, नगरसेविका दिपाली बंग आदींच्या हस्ते उपक्रमाला प्रारंभ झाला.
प्रताप ढाकणे मित्र मंडळाच्या वतीनेही सुमारे एक लाख रुपयांची मदत व शिधा गरजूंना वाटप केला. मोहटा देवस्थान समितीने गेल्या पंधरा दिवसापासून शहरासाठी तीन वाहने, रुग्णवाहिका, कर्मचारी, प्रचार यंत्रणा तालुका प्रशासनाच्या ताब्यात दिली असून ५१ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले.
तालुका प्रशासनाने मागणी केल्यास पाथर्डी येथे मजूर, प्रशासकीय कर्मचारी, भिक्षेकरी व्यक्तींसाठी मोफत महाप्रसाद उपक्रम राबवण्याची तयारी देवस्थान समितीने ठेवली. यासाठी देवस्थान समिती अध्यक्ष न्यायमूर्ती अशोक भिलारे व सर्व विश्वस्तांनी पुढाकार घेतल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com