अहमदनगर :- महापालिकेमार्फत मोकाट जनावरे पकडण्यात येत आहे, पकडलेल्या जनावरापैकी तीन जनावरे दगावली आहेत. दोन जनावरांच्या पोटात सुमारे ६५ किलो प्लास्टिक आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
दरम्यान, मनपामार्फत पकडण्यात आलेल्या ३४ जनावरांची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मनपामार्फत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
महिनाभरापूर्वी राबवलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मनपाच्या कोंडवाड्याची दूरावस्था झाल्याने मनपाने तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर खासगी संस्थेच्या सहकार्याने कोंडवाडा उभारला आहे. मनपाने या कोंडवाड्यात सुमारे १०० जनावरे पकडून ठेवली होती. त्यापैकी तीन गायींचा मृत्यू झाला आहे.