६८ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू,पारनेर तालुक्यात खळबळ !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथील ६८ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनाची लागण झाल्यामुळे नगरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते

कला रात्री त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचा अंत्यविधी नगर येथेच करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे

हा व्यक्ती आठ दिवसापासून आजारी होता त्याला काही प्रमाणात शारीरिक व्याधी होत्या त्याने काही काळ कान्हूर पठार येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेतले

त्यानंतर नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते तिथे त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील 8 लोकांचे स्राव कोरोना चाचणी साठी घेण्यात आले होते. त्याचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत तर त्यांच्या शेजारच्या एका व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव प्राप्त झाला आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe