अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सावेडी उपनगर परिसरात वैदुवाडी येथे तब्बल 84 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
अहमदनगर पोलिसांकडून याबाबत तपासणी सुरू असून चौकशीसाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.