अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- निसर्गाची कृपा, चमत्कार कोणाच्या सांगण्यावरून घडत नाही किंवा कोणाच्या सांगण्यावरून बदलतही नाही. निसर्गाचे अनेक चमत्कार किंवा मानवी शक्तीला न समजणारी कोडे खूप आहेत.
अशीच निसर्गाची चमत्कारिक घटना घडणारे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे. ते म्हणजे अकोले तालुक्यातील चोंढे घाटावरती वसलेले घाटघर. दरवर्षी हे घाटघर गाव चार महिने धुक्यात असतं.
ना दिसतो रस्ता ना गाव. संपूर्ण धुक्यात हरवलेले असते हे गाव. याठिकाणी दरवर्षी पाच हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो. जेमतेम ८०० लोकवस्ती असलेल्या या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे.
दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होते. पाऊस व धुके या गावात सतत असते. भात मासे आमटी हे त्यांचे मुख्य अन्न. चौमुळी कौलाची घरे पारंपारीक पद्धतीने दगडी बांधकाम, लाकूड, वापरून उभारलेली ही घरे पर्यटकना आकर्षित करतात.
निसर्गाने नटलेल्या या परिसरला सह्याद्रीच्या डोंगर रांगाने वेडले आहे. त्यावरून पडणारे पांढरेशुभ्र धबधबे, कोकणकड्याच्या परिसरात येणारे धुके, पाऊस व त्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येतात. तुम्हीही नक्कीच या गावाची सैर एकदा कराच.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved