विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी शिर्डीमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- शिर्डीमध्ये एका विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याघटनेत सविता सोमनाथ गायकवाड हिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महिलेच्या पती सोमनाथ मल्हारी गायकवाड (वय ४२, रा. आंबी, ता. राहुरी सध्या रा. नादुर्खी) याने शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

यावरून पोलिसांनी विनायक सोपानराव चौधरी (रा. नादुर्खी) व रिक्षा चालक रवि पवार (रा. शिर्डी) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सविता सोमनाथ गायकवाड ही पती व दोन मुलींसह चौधरी वस्ती येथे 3 वर्षापासून राहत होती.

मुलगी बेपत्ता आहे अशी तक्रार चौधरी यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. ती पळुन जात असताना त्या प्रकरणात सविता गायकवाड हिच्या मोबाईलचा वापर झाला होता, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते.

या आरोपावरून सविता सोमनाथ गायकवाड या महिलेला शिवीगाळ करून जे मारण्याची धमकी दिल्याने तीस वर्षीय महिला सविता सोमनाथ गायकवाड (वय 33) हिने राहाताजवळ प्रवासात असताना रोगर नावाचे विष प्राशन करुन आत्महत्या केली.

दरम्यान या प्रकरणी मयत विवाहितेच्या पतीच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास प्रभारी उपविभागीय अधिकारी राहुल मदने हे करीत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe