‘ह्या’ ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  12 डिसेंबरला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. या निमित्ताने त्यांचा पाथर्डी शहरात बसविण्यात येणाऱ्या पुर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचा प्रयत्न असून यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतल्याचे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले.

राष्ट्रसंत भगवान बाबांच्या नावाने पुतळा स्थापन समिती अस्तित्वात येणार आहे. यासाठी गेल्या चार वर्षात विविध बैठका घेऊन कार्यकर्त्यांनी कामाचे नियोजन केले.

सुमारे दोन टन वजनाचा ब्राँझ धातुचा पुतळा बसवण्यात येणार असून यासाठी आवश्यक परवानगी व कायदेशीर बाबींची पुर्तता करण्याच्या प्रक्रिया वेगाने सुरू झाल्या आहेत.

माजी आ. स्व.राजीव राजळे यांचे स्वप्न होते की त्यांचा पुतळा पाथर्डीमध्ये असावा. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न समितीकडून होत आहे.

या पुतळ्यासाठी 12 फूट उंच चौथरा व 12 फूट उंचीचा पुर्णाकृती पुतळा अशी सुमारे 24 फूट उंची असणार आहे.नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे हे सध्या पुतळा तयार करत असल्याचे आ.राजळे यांनी सांगितले.

यामध्ये शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावाचा प्रतिनिधिक व ऐच्छिक स्वरूपात आर्थिक सहभाग असणार आहे.पुतळ्यासाठी सुमारे वीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment