अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव नाहेरमळा (वडळी रोड) येथील योगेश सुदाम दळवी या प्रगतशील शेतकर्याच्या राहत्या सपराला शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गॅस टाकीचा स्फोट झाला.
यामुळे लागलेल्या आगीत शेतकर्याचे घरातील धान्य, संसारोपयोगी वस्तू, सव्वा लाखाची शेतीची औषधे तसेच 20- 25 हजाराची रोख रक्कम जळून मोठे नुकसान झाले.
याबाबत सविस्तर असे की कोळगाव येथील प्रगतशील शेतकरी योगेश सुदाम दळवी यांच्या रा. नाहेरमळा ( वडळी रोड ) राहत्या छपराला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गॅस टाकीचा स्फोट झाला.
छपरातील धान्य, संसारोपयोगी वस्तू, सव्वा लाखाची शेतीची औषधे तसेच 20- 25 हजाराची रोख रक्कम जळून खाक झाली. सुदैवाने घरातील सर्वजण सकाळचे घरातील काम उरकून शेतीच्या कामासाठी शेतात गेल्याने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®