पाण्यावर तरंगणार आलिशान घर 

लंडन : सध्याच्या बदलत्या युगात आरामदायक आयुष्याची व्याख्याही बदलत आहे. एका प्रशस्त घरा सगळ्या अत्याधुनिक सुविधा असणे याला साधारणपणे आलिशान आयुष्य समजले जाते मात्र आता हा विचार जुना झाला. अलिकडच्या काळात घराबाहेरही अशा आरामदायक जीवनाचा शोध घेतला जातो.

हीच बाब लक्षात घेऊन ब्रिटनमध्ये एका लक्झरी याटला व्हिलाचा रूप देण्यात आले आहे. याटवरील हा आलिशान महाल ४३०० चौरस फुटांचा आहे. त्याची खासियत म्हणजे हा महाल पाण्यावर तरंगणारा आहे. ५५ लाख डॉलर म्हणजे सुमारे ४० कोटी रुपये किंमत असलेल्या या व्हिलामध्ये सगळ्या आधुनिक सुविधा आहेत.

या याटला इले्ट्रिरक इंजिन दिलेलेअसून सोलर पॅनेलही आहे. म्हणजे यात पर्यावरणाचादेखील विचार करण्यात आला आहे. या आलिशान महालामध्ये चार बेडरूम, एक लिव्हिंग रूम, एक किचन, चार बाथरूम आणि एक स्वीमिंग पूलही आहे. त्याच्या छतावर सौर पॅनेल बसविलेले आहे.

शिावाय पावसाचे पाणी शुद्ध करण्यासाठी एक जलशुद्धीकरण यंत्रणाही आहे. त्यात ४ हजार गॅलेन पाणी साठविले जाऊ शकते. विविध प्रकारच्या सुविधा असल्या तरी ही याट समुद्री वादळात टिकाव धरण्यास सक्षम नाही. त्यामुळे हा महाल स्थिर पाण्यात वापरला जातो.

या व्हिलाचे डिझाइन करणारे निकोलस डी यांच्या माहितीनुसार, त्यातून जास्त लांबचा प्रवास केला जाऊ शकत नाही. अर्थात असे असले तरीही काही एखाद्याकडून ऑर्डर मिळाल्यास कंपनी असा पाण्यावर तरंगणारा बंगला बनवून देण्यास तयार आहे.