अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- ल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येत बाबरी मशीदीच्या ठिकाणी आता भव्य दिव्य राम मंदिर उभारलं जाणार आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये याचं भूमीपूजनही करण्यात आलं आहे.
त्यानंतर आता आयोध्येतून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. अयोध्येतील धनीपूर येथे उभारण्यात येणाऱ्या मशिदीचा आराखडा जवळपास निश्चित करण्यात आला आहे.

इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने मिशिदीचं डिझाईन आणि आर्किटेक्ट प्रसिद्ध केले. अशी असणार आहे मशिदीचे डिझाईन फाउंडेशनकडून जारी करण्यात आलेल्या रचनेनुसार मशिदीला घुमट असणार नाही.
मशिदीव्यतिरिक्त परिसरात संग्रहालये, रुग्णालये, ग्रंथालये आणि कम्युनिटी किचनही उभारण्यात येणार आहेत. चित्रातील गोल इमारत मशिदीची असून उर्वरित सुविधांसाठी चौकोनी इमारत असणार आहे.
धनीपूर मशिद पुढच्या दोन वर्षात उभारण्याचं लक्ष्य आहे. शिदीत एकाच वेळी दोन हजार लोकांना एकत्र नमाज पठण करता येईल, अशी सुविधा करण्यात येईल.
दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी (JMI)च्या आर्किटेक्चर विभागाचे डीन प्रोफेसर एस एम अख्तर यांनी सांगितलं, की हा प्रकल्प म्हणजे केवळ धार्मिक स्थळ असणार नाही, तर मानवतेची सेवा देणारं एक केंद्र असणार आहे.
म्हणूनच यामध्ये हॉस्पिटल आणि लायब्ररी बनवण्याकडे समान लक्ष दिलं जात आहे. ही मशीद पारंपरिक नव्हे तर भविष्याला साद घालणारी असेल.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com