अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : अहमदनगर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत अद्याप तपास लागला नाही.
तोच संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथील कवटेवाडी शिवारात वनविभागाच्या क्षेत्रात एका चरामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. जवळे बाळेश्वराच्या कवटेवाडी येथील वनविभागाच्या सर्व्हे नंबर २६८ मध्ये काही मजूर काम करत होते.
यावेळी त्यांना एका चरामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. याबाबत त्यांनी वनरक्षक कडनर यांना कळविले. पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोकॉ संतोष खैरे, विशाल कर्पे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
६० ते ६५ वयोगातील महिलेचा मृतदेह असून तिच्या अंगावर हिरव्या रंगाची ठिपक्याची साडी आहे. घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews