अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतमजुरीचे काम करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील रामगड येथील ३६ वर्षांच्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
याप्रकरणी बेलापूर (कुऱ्हे वस्ती) येथील शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रामगड येथील पीडित महिलेस आरोपी राजेंद्र रघुनाथ भांड (रा. कुऱ्हे वस्ती) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले.
संबंधित महिलेने याबाबत पोलिसात फिर्याद दाखल केली. अत्याचारित महिलेने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र रघुनाथ भांड (रा. कुऱ्हे वस्ती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.