गावाकडे पायी चाललेल्या महिलेची बँकेत झाली प्रसूती…

Ahmednagarlive24
Published:

सोनई :- कोरेगाव भीमा येथे पोटापाण्यासाठी मोलमजुरी करणारे कुटुंब काम नसल्याने व खाण्याची भ्रांत निर्माण झाल्याने गर्भवती पत्नीसह यवतमाळ येथे पायी जात होते. त्यातील संदीप काळे यांच्या पत्नी निर्मला संदीप काळे (३२) या गर्भवती महिलेस वडाळा बहिरोबा येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रसूती कळा सुरू झाल्या.

तिला तिच्या कुटुंबीयांनी बडोदा बँकेच्या वडाळा येथील शाखेत आडोशाला नेले. यावेळी गृहरक्षकदलाचे पत्रकार विकास बोर्डे व ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब येताच वडाळा बहिरोबा येथील आरोग्य उपकेंद्रातील परिचारिका न्यालपेल्ली व सिस्टर काळे यांना बोलावून घेतले. त्यांनी या महिलेची सुखरूप सुटका केली.

सायं ५.२० वाजता या महिलेस कन्यारत्न प्राप्त झाले. घटनास्थळापासून जवळच असणाऱ्या महिलेने माणुसपण जपत आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत केली. घटनेची माहिती तलाठी भाकड भाऊसाहेब यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिली. तहसीलदारांनी तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांना सोबत घेऊन वडाळा बहिरोबा येथे धाव घेतली.

यावेळी लॉकडाऊन बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिस कॉन्स्टेबल सुनील आव्हाड, विकास बोर्डे यांनी बंदोबस्त ठेवला. प्रशासनाने या महिलेस व नवजात बालकास पुढील उपचारासाठी नेवासेफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. बाळ व आई दोघेही सुखरूप असल्याचे नेवासा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी आधार सेवा संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयवंत मोटे, उपसरपंच राहुल मोटे, नीलेश मोटे, सचिन बहादूरे, अभिजित पतंगे, गणेश फाटके, सागर बहादूरे, या युवकांनी या महिलेबरोबरच तिच्या कुटुंबियांना व प्रशासनाला लॉकडाऊनचे संकेत पाळत मदत केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment