अहमदनगर ब्रेकिंग : नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- तालुक्यातील दाढ खुर्द शिवारातील प्रवरानदी पात्रात बुधवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या शरद भागाजी पर्वत (वय २४) या तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी दाढ खुर्द येथील तीन तरुण पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रात गेले होते. यावेळी शरद पर्वत हा तरुण बुडाला

असून यांची माहिती आश्वी पोलिसांन कळताच निरीक्षक सुधाकर मांडवकर, मुख्य हवालदार मोरे, ग्रामसेविका वाळे, कामगार तलाठी सांगळे, सरपंच सुमनताई जोशी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी हवालदार संतोष शिंदे, शिवाजी नऱ्हे तसेच गावातील संदिप बोरसे, गोट्या पर्वत, दत्तू मेंगाळ, कार्तिक कहार आदींनी नदीपात्रात उतरून शरदचा शोध सुरु केला.

अथक प्रयत्नानंतर शरदचा मृतदेह सापडला असून पंचनामा करण्यात आला. यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

शरद याने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात जीएनएम हा कोर्स पूर्ण केला होता. त्याच्या घरची परिस्थिती हालाखीची असून त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परिवार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment