अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील बेट भागातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. या प्रकारामुळे खळबळ उडाली.
अपहरण झालेल्या मुलाचे वय १५ वर्षे ५ महिने आहे. राहत्या घरातून मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे.
मुलाची आई सुनीता रमेश भाकरे (वय ३५) हिने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अर्जुन दारकुंडे तपास करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved