अहमदनगर : शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सर्वसामान्य नगरकरांचा आवाज उठणे गरजेचे आहे. अहमदनगर स्पीक्सच्या माध्यमातून नगरच्या सर्वांगीण विकासाचा आवाज बुलंद होणार आहे,असे स्पष्ट करीत अहमदनगर स्पीक्स या चळवळीची घोषणा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
हि चळवळ राजकारणविरहित असून फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ चालणार आहे.यासाठी कळमकर यांनी पुढाकार घेतला आहे.बघायचं नाही,बोलायचं असा मंत्र या चळवळीद्वारे देण्यात येणार आहे.

यावेळी कळमकर म्हणाले,आपण शहराचे महापौरपद भूषविलेले असून मिळालेल्या कमी कालावधीतही प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न केला.शहरातील मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर दिला.महापालिकेतील कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करताना लोकांच्या असलेल्या अपेक्षा व त्या पूर्ण करताना येणारे अडथळे याची जाणीव झाली.
याशिवाय नगरमधील विविध क्षेत्रातील मंडळी तसेच शहरात चांगले काही तरी करण्याची तळमळ असलेली तरुणाई यांच्याशी संवाद साधताना नेहमी एक गोष्ट समोर आली की,लोकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत नाही.अशा अनेक बाबींचा अभ्यास करून अहमदनगर स्पीक्स हे नगरकरांचा आवाज ठरणारे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.
- महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन रेल्वे मार्ग ! ‘ही’ शहरे एकमेकांना जोडली जाणार, कसा असणार रूट ?
- कोणत्या राज्यात पहिल्यांदा आठवा वेतन आयोग लागू होणार ? महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार 8th Pay Commission
- स्वतःचा बिजनेस सुरु करायचाय ? मग दीड लाखाच्या गुंतवणूकीत ‘हा’ बिजनेस सुरु करा, दरमहा मिळणार 60 हजारापर्यंतचा नफा
- जमीन खरेदी विक्रीच्या नियमांत मोठा बदल, ‘हे’ 4 नवीन नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत !
- IDBI Bank Bharti 2025: IDBI बँक अंतर्गत 650 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा