अहमदनगर : नगर दौंड रस्ता हा प्रवासाच्या दृष्टीने चांगला झाला असला तरी भरधाव जाणारी वाहने, नियमांचे होणारे उल्लंघन, दारूच्या नशेत वाहन चालवणे यामुळे हा रस्ता अल्पावधीतच मृत्यूचा सापळा बनला आहे.

दि.२४ रोजी नगर दौंड महामार्गावर विसापूर फाट्याजवळ नगरकडून फलटणकडे धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या टाटा सफारी (क्र.एम.एच.१६.ए.जे.५०६७) या वाहनाचा वेग आवरता न आल्याने वाहन पलटी होऊन चालक चंदन किसन शिंदे (वय ४२ वर्ष रा. सिव्हील हडको, अहमदनगर) हा जागीच ठार झाला.
तर ३ जण गंभीर जखमी झाले होते.