अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर शहरातून बेड्यांसह फरार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सचिन काळे याला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव परिसरात सात महिन्यांपूर्वी खून झाला होता. या प्रकरणी संशयित आरोपी सचिन नेमाजी काळे (वय 39, रा.मुठेवाडगाव)
याला येथील ग्रामीण रुग्णालयातून वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहात घेवून जाताना पोलिसांना चुकारा देत हरेगाव रस्त्यासमोर पोलीस वाहनाचा मागील दरवाजा उघडून बेड्यांसह तो फरार झाला होता.
पोलीस शिपाई दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, शहर पोलिसांकडून अनेक महिन्यांपासून त्याचा शोध सुरू आहे.
आरोपी काळे हा वास्तव्य बदलून नारायणगाव (जि.पुणे) येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी काळे याला ताब्यात घेतले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved