अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- मकर संक्रांतीचा सण अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान शासनाने घातक मांजा वापरावर बंदी घातलेली आहे. असे असूनही विक्रेते चोरट्या पद्धतीने मांजा विकत आहेत.
याबाबत वनविभागाने मंगळवारी नगर आणि नेवासा तालुक्यात नायलॉन मांजा विकारी कारण्याऱ्यांविरोधात धडक कारवाई केली आहे.
नगर शहरातील ए वन पतंग सेंटर (मनोज देवीचंद रोडा, आनंदी बाजार), बालाजी पतंग सेंटर (संजय किसनराव पेगडवाल (श्रमिकनगर, सावेडी),
परदेशी बंधू पतंग स्टॉल (राकेश उमरावसिंग परदेशी, तोफखाना), ज्योती काइटस् (विजया सदानंद पेत्राम, बागडपट्टी), ज्योती काइटस् (साईनाथ सदानंद पेत्राम, बागडपट्टी) या पतंग विक्रेत्यांवर वनविभागाने धडक कारवाई केली आहे.
या कारवाईत चिनी बनावटीचा मांजा जप्त केला आहे. वनविभागाच्या पथकाने हि कारवाई केली आहे. दरम्यान चिनी मांजामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पक्षी जखमी होऊन मृत्युमुखी पडत आहेत.
याची दखल घेत, वनविभागाने ही कारवाई केली. हा मांजा कोणीही वापरू नये. त्याचा वापर करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, अशा इशारा वनविभागाने दिला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved