अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग याने १४ जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली. संपूर्ण इंडस्ट्रीवर त्यामुळे शोककळा पसरली.
त्यानंतर अनेक वाद , टीका करण्यात आल्या. त्यानंतर नेपोटीझमचा वाद उफाळून आला. पोलिसांनी या प्रकरणी अनेक दिग्गजांना चौकशीसाठी बोलावले .
आता या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात बोलावले. पोलिसांनी आतापर्यंत २८ जणांचा जबाब नोंदविला आहे.
त्यानंतर आता संजय लीला भन्साळी यांची चौकशी होणार आहे. ही चौकशी करण्यापूर्वी भन्साळी यांना पोलिसांनी समन्स बजावले होते.
त्यानुसार ते आज चौकशीसाठी हजर झाले. संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या दोन चित्रपटांसाठी सुशांतला साइन केलं होतं. मात्र ऐनवेळी त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं.
म्हणून सुशांत नैराश्यात गेला असं म्हटलं जात आहे. त्यामुळेच या प्रकरणी संजय लीला भन्साळी यांची चौकशी करण्यात येणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews