अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री राणी मुखर्जी यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेताना त्या भावूक झाल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत त्या साईचरणी नतमस्तक झाल्या.
साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा साईबाबांची मूर्ती देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व जयश्री मुगळीकर यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री आकाश किसवे, दिलीप उगले व पोलीस उपनिरीक्षक मधुकर गंगावणे आदी उपस्थित होते.
अभिनेत्री मुखर्जी या लग्न व मुलगी झाल्यानंतर प्रथमच शिर्डीत आल्या. त्या साईबाबांच्या निस्सीम भक्त असून यापूर्वी अनेकदा त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबाचे दर्शन घेतले आहे. साईबाबांच्या कृपेने मला मुलगी झाली.
बाबांनी बोलावले त्यामुळे शिर्डीला आले. बाबांना धन्यवाद देण्यासाठी आले आहे. बाबांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. मी लग्न व मुलगी झाल्यानंतर प्रथमच शिर्डीत आले असल्याचे सांगितले