सैराटच्या यशानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरू करतीये हे काम !

Ahmednagarlive24
Published:

‘सैराट’च्या सुपरडुपर यशानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरूकडे  ऑफर्स अनेक असल्या, तरी ती नेमक्या कुठल्या सिनेमात दिसणार याविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे. 

सध्या अनेक कलाकार वेब सीरिजकडे वळले आहेत. रिंकू राजगुरूनंही वेब सीरिजची निवड केली आहे. या वेब सीरिजचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.
अलीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या ती एक हिंदी वेब सीरिज करत आहे.बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता ही या या वेब सीरिजमध्ये काम करते आहे.
एका बड्या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत ती काम करत असून तिच्या ह्या वेब सीरिजचं चित्रीकरण माटुंग्याच्या एका चाळीमध्ये सुरू आहे.
 रिंकूची ही पहिलीच वेब सीरिज असून चाळीत राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबामधल्या एका मुलीची तिची भूमिका असल्याचं बोललं जातंय.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment