माजी आमदार विजय औटी यांनी दिलेलं ते आव्हान तिने स्वीकारले आणि बनली न्यायाधीश!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : शहरातील अ‍ॅड. गौरी घनशाम औटी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर व प्रथम न्यायदंडाधिकारी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.

गौरी औटी यांनी नगरच्या लॉ कॉलेजमध्ये एलएलबी व एलएलएमचे शिक्षण पूर्ण करून पारनेर येथील दिवाणी न्यायालयात तसेच नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वकील म्हणून काम पाहिले.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी तसेच पं. स. च्या माजी सभापती जयश्री औटी यांच्या आग्रहाखातर गौरी यांनी न्यायाधिशाची परीक्षा देण्याचे आव्हान स्वीकारले.

पुणे येथे बी. ई. आव्हाड लॉ क्लासेसमध्ये प्रवेश घेत गणेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नांत यश संपादन करून तालुक्यातील पहिल्या न्यायाधीश होण्याचा बहुमान पटकावला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment