अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उद्या अर्थात सोमवारी दि. २७ जुलै रोजी ५० बेड्सच्या ‘कोविड रुग्णालया’चे पारनेरमध्ये लोकार्पण होणार आहे.
याप्रसंगी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक राजेश गवळी आदी उपस्थित राहणार आहेत,
अशी माहिती जि. प. सभापती काशिनाथ दाते यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, पारनेर तालुक्यात प्रथमच ऑक्सिजन सोयीसुविधासह अद्ययावत कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.
गरज पडली तर अद्ययावत बेड वाढविण्यात येतील, असेही सभापती गणेश शेळके आणि उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांनी सांगितले आहे.
दरम्यान, रक्तदानासह सामाजिक उपक्रमांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरें यांनी केले होते.
त्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेनेच्या वतीने सोमवारी दि.२७ जुलै रोजी पारनेर येथील बाजारतळावरील आंबेडकर भवनात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे,
पारनेर तालुक्यातील गावागावात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पारनेर शिवसेना पक्षाच्यावतीने १ लाख मास्कचे आणि ५० हजार सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती शहरप्रमुख निलेश खोडदे आणि विजय डोळ यांनी दिली.
-
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा