अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर न्यायालयाची इमारत आहे, त्या जागी उभारावी व तिचे स्थलांतर पारनेर सुपा रोडवरील गट नंबर मध्ये ९६ मध्ये स्थलांतरित करू नये, या प्रमुख मागणीसाठी पारनेर संघर्ष समितीच्या वतीने सुभाष कापरे यांनी गेल्या आठ दिवसापासून पारनेर पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी सोमवार सायंकाळी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी बोलणे झाले असून आगामी कॅबिनेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन आहे त्या जागेवर ही इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कापरे यांनी आपले उपोषण मागे घेतले.

पारनेर न्यायालयची इमारत पारनेर सुपा रोडवरील गट नंबर ९६ मध्ये प्रस्तावित असून न्यायालयाची इमारत उभारणी साठी जागा पण ताब्यात घेण्यात आलेली आहे परंतु ही जागा पाहणी शहरापासून एक ते दीड किमी अंतरावर असून सर्वसामान्य तालुक्यातील ग्रामस्थांना गैरसोयीची असल्याचा आरोप संघर्ष समितीने आपल्या निवेदनात केला आहे.
तसेच सध्या असलेल्या पारनेर न्यायालयाच्या इमारतीच्या परिसरात पारनेर तहसील कार्यालय पारनेर पोलीस स्टेशन भूमिअभिलेख कार्यालय यांच्यासह इतर कार्यालय मोठ्या प्रमाणावर असून सर्व अधिकारी कर्मचारी व सर्वसामान्यांच्या दृष्टीने सोयीचे आहे परंतु पारनेर सुपा रोडवरील गट नंबर ९६ मध्ये ही इमारत झाल्यास सर्वांच्या दृष्टीचे गैरसोयीचे होती होईल
त्यामुळे आहे त्या ठिकाणी पारनेर न्यायालयाच्या जागेतच या नवीन इमारती करावी या मागणीसाठी गेल्या ८ दिवसांपासून संघर्ष समितीच्या वतीने कापरे यांनी उपोषण चालू केले होते. या उपोषणाला अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com