अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासे :- स्वतंत्र्यानंतर पहिल्यांदा ना. शंकरराव गडाख यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या रुपाने नेवासा तालुक्याला न्याय मिळालेला आहे.
इतक्या वर्षात पहिल्यांदा नेवासा तालुक्याचा मंत्रिमंडळात समावेश झालेला असून त्याचा आनंदच आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी होऊन एवढे मोठे पद मिळणे कठीणच असते.
मात्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांच्यावर मोठा विश्वास टाकला असून हा विषय ते सार्थ ठरवतील.
मिळालेल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून शंकरराव हे जिल्ह्यातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी ताकदीनी प्रयत्न करतील.
विशेषत: पश्चिमेला घाटमाथ्यावरून वाया जाणारे पाणी जिल्ह्यात आणण्यासाठी ते मंत्रिपदाच्या माध्यमातून प्रयत्न करत, असा विश्वास ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व्यक्त केला आहे.