अहमदनगर :- प्रेमदान चौकातील एका हॉटेलमध्ये प्रेमप्रकरणातून युवकावर ॲसिड हल्ल्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती.ह्या घटनेचा उलगडा आज झाला आहे
प्रेमदान चौकातील ॲसिड हल्ला प्रकरणात संशयित म्हणून पकडलेल्या युवतीने हल्ला केल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान आज सायंकाळी पोलिसांनी तिला अटक केली असून क्राइम पेट्रोल ही टीव्ही सीरिअल पाहून हे कृत्य केल्याचे तिने कबूल केले.
अमीर याचे दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम प्रकरण सुरू होते याचा बदला घेण्यासाठी सदर युवतीने प्लॅन करून असिड फेकले व पलायन केले असल्याचे समोर आले आहे सदर ॲसिड कुठून आणले याचा पोलिस शोध घेत आहे.
आष्टी तालुक्यातील अमीर या मुलाचे नगरमध्ये शिकत असलेल्या नारायण डोह येथील २१ वर्षाच्या युवतींबरोबर प्रेमसंबंध होते.
लग्न करण्याच्या कारणावरून त्याच्यात रोज वाद होत होते ,या कारणावरून त्याच्यात सोमवारी वाद झाले सदर युवतीने त्याला तोरणा हॉटेल येथे बोलावले ,मुलगा काही आपले ऐकत नाही म्हणून सदर युवतीने त्याच्या तोंडावर ॲसिड फेकले यात तो जखमी झाला होता.
सदर घटनास्थळी युवतीच्या चप्पल व इतर वस्तू आढळून आल्याने पोलिसांचा तिच्यावर व तिच्या इतर जोडादाराबाबत संशय वाढला होता.त्यानंतर तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
दरम्यान सदर युवतीचे वडील नगरमधील एका टेलरींग दुकानात काम करत असून मुलगी एमएस्सी करत असून या हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून एका खाजगी रुग्णालयात त्याला दाखल केले आहे.
- Stock To Buy | ‘हा’ स्टॉक 13720 रुपयांवर जाण्याची शक्यता ! आयसीआयसीआय सिक्युरिटीजने दिला स्टॉक खरेदीचा सल्ला
- SBI लाईफची शेअर होल्डर्ससाठी मोठी घोषणा ! गुंतवणूकदारांना ‘इतका’ Dividend मिळणार, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे रेकॉर्ड डेट
- 15 चा ‘हा’ स्टॉक पोहचला 11,800 रुपयांवर ! 1 लाखाची गुंतवणूक बनली 7.87 कोटींची
- अतिक्रमणासंदर्भात संसदेत आवाज उठविणार ! न्यायालयीन लढाई देखील लढणार – खा. नीलेश लंके आक्रमक
- ‘इतका’ पगार असेल तर SBI कडून 50 लाखाचे Home Loan मिळणार ! तुम्हाला मिळणार का एवढं कर्ज ? EMI किती भरावा लागेल ? पहा….