Ahilyanagar News : बिबट्यांचा धुमाकूळ अहिल्यानगर मधील अनेक तालुक्यांत वाढत चालला आहे. राहुरी तालुक्यातील शेतकरी बिबट्यांनी फाडल्याची घटना ताजी असताना आता राहाता मधील घटना समोर आली आहे. दोन मोठे बिबटे दूध डेअरीत शिरले, त्यानंतर दरवाजे लॉक झाले, त्यानंतर बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला.
राहता येथील येथील चितळी रोडवरील १५ चारी परिसरात असणाऱ्या एका डेअरी प्रोडक्ट्सच्या प्रांगणात बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास दोन बिबट्यांनी प्रवेश केला. डेअरीच्या लॅब मध्ये लॅब साहित्याची मोठी नुकसान केली. दरम्यान, गेटजवळ असणाऱ्या रखवालदारावर बिबट्याने हल्ला करण्यापूर्वीच श्वानाने रखवालदाराजवळ भुंकत जाऊन त्यास जागे केले. केवळ दैव बलवत्तर म्हणून या प्रसंगातून

रखवालदाराचे प्राण या श्वानाने वाचवले.
गेल्या अनेक दिवसापासून राहाता येथील १५ चारी परिसरात तसेच जवळपासच्या परिसरात बिबट्यांचा मोठा वावर वाढतोय. अनेक शेतकऱ्यांचे शेळ्या,जनावरे व कुत्रे यांचा फरशा बिबट्यांनी केल्याच्या घटना घडत आहेत. काल पहाटे साडेपाचच्या सुमारास दोन बिबट्यांनी पंचकृष्णा डेअरी प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला.
गेटवर असलेल्या रखवालदार झोपेत असल्याने त्याच्याकडे जाणाऱ्या बिबट्यास पाहून तेथे असलेल्या कुत्र्यांनी जोरदार भुंकण्यास सुरुवात केली. त्यामुळे रखवालदारास जाग आली. बिबट्यास पाहून भयभित रखलदराने यास हाकलण्यास प्रयत्न केला. बिबट्यांनी यावेळी जवळच असलेल्या लॅब मध्ये प्रवेश केला.
दरवाजा बंद झाल्यामुळे बिथरलेल्या बिबट्यांनी आत मध्ये दूध चेक करण्याच्या अनेक लॅब साहित्याची मोठी नुकसान केली. बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळत नसल्यामुळे कार्यालयाच्या जाड काचेला धडक देत काच फोडून बिबट्या बाहेर पळाला. जवळच असलेल्या शेतामध्ये बिबटे फरार झाले. बिबट्यांचा हा थरार पाहण्यासाठी आजूबाजूच्या अनेक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र
भीतीपोटी कोणीही पुढे येत नव्हते.
दरम्यान, चितळी रोड व १५ चारी परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्यांचा मोठा वावर असून या परिसरातील शेतकरी अत्यंत भयभीत आहेत. शासनाने व वन विभागाने या परिसरात या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन त्वरित सर्व भागात पिंजरे लावून मोकाट वावरणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा व भयभीत शेतकऱ्यांना भयमुक्त करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.