अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण पुन्हा पेटणार

Published on -

अहमदनगर :- जिल्ह्यातील १४ पंचायत समितींच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज सकाळी नियोजन भवनात ही सोडत काढण्यात आली.

यामध्ये श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी, तर जामखेडचे सभापतीपद अनूसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचेही राजकारण जिल्ह्यात तापणार आहे.

सध्या सहा ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर सहा ठिकाणी शिवसेना-भाजपचे सभापती आहेत. लोकसेवा मंडळ आणि क्रांतीकारीचा प्रत्येकी एक ठिकाणी सभापती आहे.

राज्यात सध्या तिसऱ्या आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणही फिरणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस एकत्र झाले तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील सत्ता बदलण्याची शक्यता आहे.

आरक्षण पुढीलप्रमाणे :- अनुसूचित जाती- श्रीगोंदा, अनुसूचित जमाती- जामखेड, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-अकोले, पाथर्डी, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)- राहुरी, श्रीरामपूर, सर्वसाधारण-पारनेर,नेवासा, शेवगाव, सर्वसाधारण महिला-संगमनेर, राहाता, नगर, कर्जत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News