अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार भाव : 08-01-2020

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिवाळ्यात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात फळांची आवक होत आहे. सध्या गाजर, काकडी, बोरं यांची आवक चांगली होत आहे. आवक चांगली असल्याने फळांना भावही कमी-जास्त प्रमाणात मिळत असल्याचे चित्र आहे.

नगर बाजार समितीत सध्या लिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मंगळवार (दि. ७) लिंबाला प्रतिकिलोला ६०० ते ८०० इतका ठोकमध्ये भाव मिळाला.

लिंबाचे उत्पादन नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. विशेषत: जिल्ह्याच्या दक्षिण भागात याच्या बागा जास्त आहेत. या भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन म्हणून लिंबाकडे पाहिले जाते.

पण सध्या लिंबाला भाव नसल्याने लिंबू उत्पादक हिरमुसले आहेत. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात माल निघतो. पण सध्या भाव नसल्याने बागांमध्ये लिंबाचा सडा पडल्याचे दिसत आहे.

त्यातून उत्तर भारतातून कमी होणारी मागणी व वाढलेला गारठा याचा फटका लिंबाला बसला असल्याचे पाहावयास मिळत आहे. आणखी काही दिवस तरी लिंबाचे भाव असेच राहतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो ८०० – १६००, वांगी १००० – २०००, फ्लावर ४०० – १२००, कोबी १००० – २५००, काकडी १००० – १६००, गवार ४००० – ६०००, घोसाळे ६०० – २०००, दोडका २००० – ३०००, कारले ३००० – ३५००, भेंडी २००० – ५०००, वाल २००० – ३०००, घेवडा ३००० – ३५००, तोंडुळे २००० – २५००, बटाटे १००० – २०००, लसूण ८००० – १००००, हिरवी मिरची २००० – २५००, शेवगा १२००० – १४०००, डिंगरी २५०० – ३०००,भू.शेंग लिंबू ६०० – ८००, आद्रक २००० -४०००, गाजर ५०० – २०००, दु.भोपळा ८०० – १०००, मका कणसे ८०० – १०००, शिमला मिरची २००० – ३००० मेथी २०० – ३००, कोथिंबीर २०० – ३००, पालक ५०० – ७००, करडी भाजी २००-४०० , शेपू भाजी ३००-४०० चवळी २००० – २५००, चुका,बीट ४० – ५०, वाटाणा २२०० – ३०००, डांगर ४०० – १०००, मुळे ५०० – ६००. धान्य : गावरान ज्वारी ३००० -४०००, बाजरी १७११ – २२५०, मुग ६००० – ५६००, हरभरा, उडीद ५७००-६०००, मिरची ५८२० – १६८८०, गहू २७०० – २७००, सोयाबिन ३४०० – ४१००, मका १७००-१८५१, गुळ डाग २८००-५५००.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment