अहमदनगरच्या ‘या’ उद्योजकाला 5 कोटी 86 लाखांचा ‘चुना’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- नवी मुंबई येथील ईशकृपा शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रा . लि ( खारघर ) या कंपनीचे संचालक व त्यांच्या साथीदारांनी आयात मालावरील कस्टम ड्युटी व जीएसटीच्या नावाखाली नगरच्या उद्योजकाला तब्बल ५ कोटी ८६ लाख ८३ हजार ८५० रुपयांचा चुना लावला.

अहमदनगर एमआयडीसीतील जे.एम. इंडस्ट्रीज या कंपनीचे मालक निखिलेंद्र मोतीलाल लोढा यांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी ईशकृपा शिपिंग कंपनीचे संचालक नवनाथ नारायण गोळे , लतादेवी यशवंत कांबळे यांच्यासह संतोष कांबळे , निशा कुमकर व दत्ता नावाच्या व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

..अशी झाली फसवणूक
लोढा यांनी त्यांच्या कंपनीसाठी लागणारा अॅल्युमिनियमचा कच्चा माल दुबई , मलेशिया व सिंगापूर येथून आयात केला होता. हा माल मुंबई येथील न्हावाशेवा बंदरावर आल्यानंतर तेथील कस्टम ड्युटी व जीएसटी आणि कामाचा मोबदला म्हणून

सदर आरोपींनी लोढा यांच्याकडून ५ कोटी ८६ लाख ८३ हजार ८५० इतकी जास्त रक्कम घेतली. ही बाब लोढा यांचा निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुपनर हे पुढील तपास करीत आहेत .

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment