अहमदनगर : कोरोनाचा सामुदायिक प्रसार कसा झपाट्याने होऊ शकतो, याचे उदाहरण जामखेडमध्ये पहायला मिळाले आहे.
जामखेड तालुक्यात एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना लागण झाल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे.
एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे
जामखेडमध्ये तबलिगी लोकांमुळे प्रथम करोनाचा शिरकाव झाला. सुरुवातीच्या टप्प्यातील रुग्ण बरे होऊन घरी गेले.
मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना करोनाची लागण होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जामखेडमध्ये एकाचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संपर्कातील व्यक्तींची तपासणी सुरू झाली.
त्यामध्ये त्या रुग्णाची दोन्ही मुले करोनाबाधित आढळून आली.
पुढे त्या मुलांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांना बुधवारी लागण झाल्याचे आढळून आले.
त्यानंतर त्यापैकी एकाच्या वडिलांना त्यांच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
आज पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधीत आढळून आल्या.
यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या आता ४३ झाली आहे.
म्हणजेच करोनामुळे मृत झालेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधा झाल्याचे उघडकीस आले .
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®