अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले  आहेत.

संगमनेर तालुक्यातील ०७ पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित

*संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला बाधित.

दिल्ली नाका येथील 42 वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा येथील 65 वर्षीय महिला आणि 36 वर्षीय पुरुष, भारत नगर येथील 70 वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह.

पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील 30 वर्षीय पुरुष भोयरे पठार येथील 28 वर्षीय पुरुष यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह.यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे झाली लागण.

नगर शहरातील झेंडीगेट येतील 54 वर्षीय पुरुषाला तर नालेगाव येथील 58 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा.

अकोले तालुक्यातील कोतूळ येथील 48 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह.

दरम्यान, आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील ०८ रुग्णांना आज मिळाला डिस्चार्ज. कोरोनावर मात करून परतले घरी.

नगर शहरातील ०४, राहाता येथील ०३ आणि संगमनेर येथील ०१ रुग्ण बरा. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २४५.

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment