अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी रात्री उशीरा आलेल्या अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने आव्हान उभे केले होते.
महावितरणची विद्युत यंत्रणा नेस्तनाबूत झाली असून या प्रकाशदूतांनी बुधवार रात्री व गुरुवार रात्रंदिवस युद्धपातळीवर अविश्रांत वीजयंत्रणा दुरुस्तीचे कार्य करून बंद पडलेल्या 22 उपकेंद्रापैकी 21 उपकेंद्रांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे.
लघु व उच्च दाब वाहिनीचे 215 खांब कोसळले, तसेच लघु व उच्चदाबच्या 15 किमी वाहिनी तारा तुटून पडल्या. जवळपास ५६ लाखाचे नुकसान महावितरणला झाले आहे.
जोरदार वादळी वा-यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष वीज यंत्रणेवर व वीज वाहीन्यावर उन्मळून पडले होते, तर अनेक भागात झाडांच्या फांदया तुटून पडल्या.
अनेक ठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स आणि टिनपत्रे वीज वाहिनीमध्ये अडकल्याने विभागातील अनेक गावांचा व भागाचा विजपुरवठा खंडित झाला होता.
विद्युत खांब व तारा कोसळल्याने 22 उपकेंद्र बंद पडले होते. मात्र सात्रळ व कणगर उपकेंद्र वगळता विद्युत यंत्रणा सुरळीत करीत सर्व भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com