अहमदनगर :- कायद्याचे उल्लंघन करून अहमदनगर जिल्ह्यात वास्तव केल्याप्रकरणी २४ परदेशी नागरिकांना अटक शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अन्य ५ परदेशी नागरिकांना नंतर अटक करण्यात येणार आहे.
सिव्हिल हास्पिटलमधून सोडल्यानंतर २४ परदेशी नागरिक व ५ भारतीयांना अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी न्यालयासमोर हजर केले जाणार
दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये मरकजसाठी अनेक देशातील नागरिक आले होते. त्यातील काही जण नगरमधील मुकुंदनगर, जामखेड, नेवासा येथील धार्मिक स्थळी राहिले होते.
या तिन्ही ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात काही नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले आहे.
जिबुती, बेनिन, डिकोटा, आयव्हेरी कोस्ट, घाना, इंडोनेशिया, ब्रुनई या देशातील हे नागरिक आहेत.त्यांना वास्तव्य करण्यास मदत करणाऱ्यांविरूद्ध यापूर्वीच गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील चार जणांना करोनाची लागण झाली होती. तर इतरांना सिव्हिलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®