अहमदनगर ब्रेकिंग : 50 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीरामपूर शहरातील 50 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूमुळे श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मयत झालेल्या रुग्णाचा आकडा 7 वर जाऊन पोहोचला आहे

या महिलेबरोबरच या महिलेच्या पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. काल पुन्हा श्रीरामपूर तालुक्यात नवीन 19 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्या 227 वर जावून पोहोचली आहे.

सदर 50 वर्षीय महिलेवर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. तिला पॅरेलीससचा झटका आल्याने तिच्यावर उपचार सुरू होते.

त्यादरम्यान ती महिला कोमात गेली. काहीकाळ ती शुध्दीवर आल्यावर तिच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले. मात्र उपचार सुुरू असतानाच काल तिचा मृत्यू झाला.

या महिलेवर काल सकाळी नगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment