अहमदनगर ब्रेकिंग : पिस्तुलचा धाक दाखवून सराफांचे 70 लाळांचे दागिने लुटले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील दोन सराफ व्यवसायिकांना दुकान बंद करून घरी जात असताना बाबुळगावजवळ गाडी अडवून लुटले.

कोयत्याने मारहाण करून 70 लाख रुपयांचा ऐवज लुटण्याने खळबळजनक उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मिरजगाव येथील सराफ अतुल पंडीत यांचे माहिजळगाव येथे सराफ दुकान असून नेहमी प्रमाणे सहाच्या दरम्यान त्यांचे लहान बंधू राहूल पंडीत व अतुल पंडीत नेहमीप्रमाणे दुकान आवरून आपल्या चारचाकी गाडीतून मिरजगाव येत होते.

नगर- सोलापूर महामार्गावर बाभूळगाव शिवारात दोन मोटारसायकलवरुन आलेल्या सहा चोरट्यांनी त्यांच्या चारचाकी गाडीला मोटारसायकल आडव्या लावून गाडीची काच फोडून डोक्याला पिस्तुल लावून त्या दोघांना सतूर, तलवार व लाकडी दाडक्याने बेदम मारहाण करून त्यांच्या अंदाजे साठ लाख रूपयांचे सोने-चांदीचे दागिने घेऊन पसार झाले,

यावेळी पंडीत यांनी तातडीने या घटनेची माहिती आपल्या मित्रांना,नातेवाईकांना व पोलिसांना कळवली, यावेळी एका गाडीवरील तीन चोरटे माहिजळगावच्या दिशेने तर दुसर्या गाडीवरील तीन चोरटे बाभूळगाव परिसरात पळाले. या दरम्यान मोठ्या संख्येने नागरीक जमा होऊन चोरट्यांच्या शोध सुरू केला

यावेळी चोरट्यांनी बाभूळगावमध्ये वैरणीच्या गंजीजवळ पडलेल्या प्लास्टिकच्या ताडपत्रीखाली मोटारसायकल झाकून परिसरातच लपून बसले असून पोलीस व परिसरातील नागरीक चोरट्यांचा शोध उशीरापर्यंत घेत होते. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment