अहमदनगर ब्रेकींग : कारने एकास चिरडले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ भरधाव वेगात असणाऱ्या कारने एकास चिरडले आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी , आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खडका फाट्यावरून नेवासाकडे येणाऱ्या स्विफ्ट मारुती कारने पायी चालणाऱ्या जगन्नाथ गंगाधर पवार वय ( ६५ ) यांना चिरडून सदरची गाडी दिशा दर्शक फलकाला आदळून

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या काट्यात शिरली. या अपघातात पवार जागीच ठार झाले . घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment