अहमदनगर ब्रेकिंग : चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार !

Published on -

कोपरगाव :- तालुक्यातील सुरेगाव येथे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचे शाळा सुटल्यानंतर अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धककादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी याच गावातील तरुण अमोल अशोक निमसेविरुध्द बलात्कार, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, अपहरण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

शुक्रवारी सायंकाळी  आरोपीने मोटारसायकलवरुन मुलीचे अपहरण केले होते. शनिवारी मुलगी गावामध्येच आढळून आली. त्यानंतर तिने तिच्याबरोबर झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही कमरेचे फुटेज तपासले. त्यात एक तरुण मुलीला गाडीवरून नेत असल्याचे दिसून आले.

त्यावरून मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाची ओळख उघडकीस आली. रात्रभर मुलीचा पोलिस शोध घेत होते. शनिवारी दुपारी मुलगी गावामध्ये आढळून आली.

पोलिसांनी मुलीकडे चौकशी केल्यानंतर पळवून नेणाऱ्या तरुणाने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आल्यानंतर रात्री अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe