अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीपात्रात नुकताच एक ४० ते ४५ वर्ष वयाच्या पुरुष जातीचा मृतदेह आढळला असून. आढळलेला मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत असल्याने अद्याप मृताची ओळख पटली नाही.
मृताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की, शनिवारी दुपारी मुंगी येथून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात
तरंगलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची खबर मुंगीचे सरपंच दादासाहेब भुसारी यांनी पोलिसांना कळविताच बोधेगाव पोलिस दुरक्षेत्राचे पो.ना.संतोष धोत्रे, पो.कॉ.अभय लबडे , संपत एकशिंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पंचनामा करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणी करिता शेवगाव रुग्णालयास पाठविण्यात आला. तपासणी नंतर अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील या बेवारस प्रेतावर शेवगाव नगरपरिषदेच्या मदतीने त्यांचे अत्यंसंस्कार त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास करण्यात आले.
मृताच्या शरीरावरील वरची त्वचा सडून निघून गेलेली असल्याने शरीरावर काही खुणा असल्याचे आढळून आले नाही. शेवगाव पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असुन मृताची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, सदरील अनोळखी मृताबाबत कोणाला काही माहिती असल्यास शेवगाव पोलिस स्टेशन ( ०२४२९ /२२१२३३ ) किंवा तपास अधिकारी पो.ना.संतोष धोत्रे (मो.नं. ७०२०१०२८९५ ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved