पारनेर :- विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या अविनाश वामन मधे (२० वर्षे, म्हसोबा झाप) याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याची पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. मधे हा दुचाक्या चोरीतील आरोपी असल्याची माहितीही पुढे आली.
२२ नोव्हेंबरला ही मुलगी मैत्रीणीबरोबर पवळदरा येथून शाळेत निघाली असता घाटात अविनाश दुचाकीवरून आला. मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसवून त्याने तिचे अपहरण केले.
अज्ञात ठिकाणी नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. आरडाओरड केल्यास, कोणाकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली.
घरी आल्यानंतर पीडितेने आपल्या पालकांना झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. पालक तिला पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर अविनाशववर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अखेर त्यास अटक केली.