संगमनेर :- तालुक्यातील डिग्रस येथील हर्षल अण्णासाहेब तांबडे (वय 11) या विद्यार्थ्याचा घराच्या पाठीमागे खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ही घटना १६ एप्रिलला सकाळी १० च्या सुमारास तांबडेवस्तीवर घडली. हर्षल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचवीत शिकत होता. घटना घडली तेव्हा घरातील सर्व जण शेतात होते.
त्याला संगमनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. संगमनेर ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®