अहमदनगर लाईव्ह24 टीम :- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लॉजमध्ये बलात्कार करण्यात आला. ही घटना श्रीरामपूर व बेलापूर परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरात राहणारी २२ वर्षाची तरुणी हिला लग्नाचे अमिष दाखवून आरोपी अमोल ऊर्फ संतोष दासरजोगी (वय २५ रा . निपाणी वडगाव , ता . श्रीरामपूर) याने श्रीरामपूर शहरातील पंचशील लॉज येथे नेवून तिच्यावर शारीरिक संबंध करुन बलात्कार केला.
अमोल ऊर्फ संतोष दासरजोगी याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. नंतर यापुढे भेटू नकोस, असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.ऑक्टोबर २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या दरम्यान तरुणीवर इच्छेविरुद्ध पंचशील लॉजमध्ये चार वेळा बलात्कार केला.
वरीलप्रमाणे पिडीत तरुणीने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी अमोल उर्फ संतोष दासरजोगी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com