अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ ठिकाणी आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- खासगी ठिकाणी केलेल्या तपासणीत संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

प्रशासनाने सावध भूमिका घेत त्याच्या स्त्रावाचे नमुने पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविले आहेत.

तूर्तास संगमनेर शांत व सुरक्षित रहावे म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. धांदरफळ परिसर सील करायचा की अन्य काय उपायोजना करायची, यावर नियोजन सुरू केले आहे.

दरम्यान त्या व्यक्तीच्या सानिध्यात असणाऱ्या काही व्यक्तींच्यादेखील तपासण्या कराव्या लागणार आहेत. संगमनेर तालुक्यात अद्यापर्यंत आठ जणांना कोरोनाची बाधा झाली होती.

मात्र , डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नानंतर त्यांना सुखरूप घरी पोहचण्याचे भाग्य लाभले. तर तालुक्यात पोलिस, महसूल , आरोग्य व नगरपालिका यांच्या अथक प्रयत्नामुळे पुढील प्रादुर्भाव होणे टळला आहे.

कालच ( दि .6) कोरोना बाधित असलेले चार तबलीगी निगेटिव्ह होऊन तालुक्यात आले. तालुका कोरोनामुक्त झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला.

मात्र , आज पुन्हा धांदरफळ परिसरात एक नवा संशियत मिळून आला आहे. असे असले तरी संगमनेरकरांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र , प्रत्येकाने काळजी घेणे महत्वाचे आहे .

संबंधित मिळून आलेल्या व्यक्तीने एका खाजगी ठिकाणी तपासणी केली होती. त्यात तो पॉझिटीव्ह आला आहे. मात्र , त्याची सरकारी यंत्रणेकडून तपासणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment